गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुइलेन-बार्रे सिंड्रोम (GB Syndrome) या दुर्मिळ परंतु गंभीर आजाराच्या केसेस वाढताना दिसत आहेत. GB सिंड्रोम हा एक असा न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे, जेणेकरून रुग्ण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील आणि गंभीर परिणाम टाळता येतील.
GB सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. यात शरीरातील मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टिम) सूजलेल्या अवस्थेत जाते, ज्यामुळे स्नायूंना चालना देणाऱ्या नसांवर परिणाम होतो. याचा परिणाम म्हणून रुग्णाच्या हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो किंवा काही वेळेस संपूर्ण पक्षाघातही होतो.
हात-पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
स्नायूंमध्ये अशक्तपणा /कमजोरी, विशेषतः पायांपासून सुरुवात होऊन वरच्या भागापर्यंत जाणारी.
चालण्यात किंवा समतोल राखण्यात अडचण.
वेदना, विशेषतः सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये वेदना.
हृदयाची गती असामान्य होणे किंवा रक्तदाब कमी होणे.
गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनासाठी आवश्यक असलेल्या स्नायूंवर परिणाम होणे, ज्यामुळे व्हेंटिलेटरची गरज भासू शकते.
सर्वसामान्यत :, GB सिंड्रोमचा मागील काही आठवड्यांमध्ये झालेल्या संसर्गाशी संबंध असु शकतो
वायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन (जसे की सर्दी, फ्लू, किंवा गॅस्ट्रोएंटेरायटिस).
काही वेळा लसीकरणानंतर (खूप दुर्मिळ प्रसंगी).
GB सिंड्रोम संसर्गजन्य नाही, परंतु त्याची लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे.
1. लक्षणांची दखल घ्या : जर कोणत्याही प्रकारच्या स्नायू मध्ये कमजोरी किंवा सुन्नपणा जाणवू लागला, तर वेळ वाया न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. घाबरून जाऊ नका : GB सिंड्रोमची लक्षणे वेळेवर उपचार घेतल्यास बरी होतात.
3. आजाराच्या सुरुवातीसच निदान करा : GB सिंड्रोमसाठी इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG) व नर्व्ह कंडक्शन टेस्ट उपयोगी आहेत.
4. तज्ञांचा सल्ला घ्या : न्यूरोलॉजिस्टशी त्वरित संपर्क साधा.
1. इम्युनोथेरपी: प्लाझ्मा एक्सचेंज (Plasmapheresis) किंवा इम्युनोग्लोब्युलिन थेरपी (IVIG) याद्वारे प्रतिकारशक्ती नियंत्रित केली जाते.
2. फिजिकल थेरपी: उपचारानंतर पुनर्प्राप्ती प्रक्रियेसाठी फिजियोथेरपी उपयोगी ठरते.
3. तत्पर वैद्यकीय लक्ष: श्वसनाशी संबंधित समस्या असल्यास ICU मध्ये उपचाराची गरज भासू शकते.
संशय असल्यास डॉक्टरांना भेटा: GB सिंड्रोमची लक्षणे हळूहळू वाढतात, त्यामुळे वेळेत निदान होणे महत्वाचे आहे.
आजाराबद्दल जागरूकता वाढवा: आपल्या कुटुंबातील आणि मित्रांमध्ये या आजाराबद्दल माहिती पसरवा.
GB सिंड्रोम एक गंभीर परंतु उपचारयोग्य आजार आहे. पुण्यात सध्या त्याच्या वाढत्या घटनांमुळे रुग्णांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही न्यूरोलॉजिकल लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य निदान आणि तात्काळ उपचारामुळे रुग्ण पूर्णतः बरे होऊ शकतात.
आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. योग्य माहिती आणि त्वरित उपचारच जीवन वाचवू शकतात.
संचालक - शिव हॉस्पिटल, धानोरे
संचालक - अमृत हॉस्पिटल, आळंदी देवाची